कौन बनेगा करोडपतीमध्ये आठवीत शिकणारा मयांक बनला करोडपती

0

 

नवी दिल्ली ;- अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोड्पती मध्ये आठवीत शिकणाऱ्या मयंकने इतिहास रचला असून त्याने एक कोटी रुपये जिंकले आहेत. आजकाल मुले कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांना त्यांच्या ज्ञानाने प्रभावित करत आहेत. या शोला आता सर्वात तरुण करोडपती मिळाला असून एक कोटी जिंकल्यानंतर तो 7 कोटींच्या प्रश्नावर पोहोचला आहे.

या मुलानं वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी 1 कोटी रुपये जिंकून इतिहास रचला. हरियाणाचा रहिवासी मयंक सध्या हॉट सीटवर बसला आहे. तो हरियाणातील महेंद्रगड येथून आला आहे. मयंक १२ वर्षांचा असून तो आठवीत शिकतो. मयंकचे वडील दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल आहेत. या शोचा एक प्रोमोही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मयंकची अफाट बुद्धिमत्ता पाहून अमिताभ बच्चन देखील दंग झाल्याचं दिसत आहे. ज्ञान हीच गोष्ट महत्त्वाची आहे, असे मयंकचे मत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.