हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या सर्वत्र चर्चेत असलेले कर्नाटकमधील हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत.

तसेच हिजाब प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, योग्य वेळ आल्यावर या प्रकरणाची सुनावणी केली जाईल. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच अंतरिम आदेश जारी केला होता की पुढील आदेश येईपर्यंत शाळा पुन्हा सुरू कराव्यात आणि तोपर्यंत शाळांमध्ये धार्मिक पोशाखावर बंदी घालावी. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. कर्नाटक उच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ हिजाब प्रकरणी सुनावणी करत आहे. या खंडपीठात मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी, जेएम खाजी आणि न्यायमूर्ती कृष्णा ए दीक्षित यांचा समावेश आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. काँग्रेस नेते बीव्ही श्रीनिवास राव यांनीही याचिका दाखल केली होती. याआधी गुरुवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोशाख परिधान करण्यावर बंदी घातली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.