कांताई बंधाऱ्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह आढळला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहराजवळ असलेल्या कांताई बंधाऱ्यावरील काल चार मुले पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले तर एकाचा शोध सुरु होता  आहे. दरम्यान वाहून गेलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आज दुपारी आढळून आला आहे. नयन योगेश निंबाळकर (वय १७, रा. मिथीला अपार्टमेंट दुध फेडरेशन, शिवाजी नगर, जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर  परिसरातील मिथिला अपार्टमेंटमधील मुलांनी कांताई बंधाऱ्यावर आज ट्रीप काढली होती. यावेळी एकाचा पाय घसरल्यामुळे त्याचा पाण्यात तोल गेला. त्यावेळी त्याला वाचवण्यात चार मुलं पाण्यात वाहून जात होती. त्यातील तीन मुलांना वाचवण्यात यश आले. समिक्षा विपीन शिरडुकर (वय १७), योगिता दामू पाटील (वय २०) आणि सागर दामू पाटील (वय २४) यांना वाचवण्यात यश आले होते.

तर नयन योगेश निंबाळकर (वय १७) हा पाण्यात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह रात्री उशीरापर्यंत देखील न सापडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते.  सोमवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा महापालिका आणि जळगाव तालुका पोलीसांनी शोधकार्य सुरु केले होते. दरम्यान आज दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह गिरणा नदी पात्रात आढळून आला.

नयनचा मृतदेह तालुका पोलीसांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांसह मित्रमंडळींची मोठी गर्दी केली होती. नयनच्या पश्चात आई, वडील, बहिण, काका, काकू, आजी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.