जियोचा जबरदस्त प्लॅन ! ‘या’ मिळणार सुविधा..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेट्वर्क

सर्वच टेलिकॉम कंपन्या सध्या आपल्या चार्जेसमध्ये वाढ करत आहेत. याचा जोरदार फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. यातच जियोच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. जियोने ग्राहकांसाठी एक फायद्याचा प्लॅन उपलब्ध केला आहे.

भारतातील रिलायन्स जिओ ही मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओ कंपनी आपल्या ग्राहकांना कधीही निराश करत नाही. यूजर्सच्या सुविधा पाहता कंपनी नेहमीच नवनवीन प्लान आणि ऑफर्स देत असते. जर तुम्ही जियोचे ग्राहक असाल तर तुम्हाला स्वस्त दरात उत्तम प्लान मिळणार आहे. यामध्ये दररोज अमर्यादित कॉलिंग तसेच अमर्यादित डेटा देखील उपलब्ध आहे.

रिलायन्स जिओ कंपनीचा 296 रुपयांचा प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह येतो, म्हणजेच तुम्ही हा प्लान एका महिन्यासाठी वापरू शकता. रिलायन्स जिओ कंपनीचा हा एकमेव प्लान आहे, जो 30 दिवसांच्या वैधतेसह येतो.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 25 जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजे हा डेटा तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. उपलब्ध असलेला इंटरनेट डेटा एका आठवड्यासाठी किंवा महिनाभरासाठी वापरू शकता. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जात आहे.

तसेच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत. याशिवाय प्लॅनमध्ये तुम्हाला JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. जिओ कंपनीचा हा प्लान अशा यूजर्ससाठी खूप चांगला आहे ज्यांना जास्त डेटाची गरज नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.