जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक शिबीर संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव आणि आरोग्य विभाग जळगांव शहर मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आज मनपा सभागृहात कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.

या शिबीरात प्रसुतिपूर्व लिंगनिदान कायदा अर्थात पी.सी. अॅन्ड पी.एन.डी.टी अॅक्ट ‘ या विषयावर सहा. सरकारी अभियोक्ता रंजना पाटील तसेच ‘विवाह प्रतिबंधक कायदा’ या विषयावर विशेष सहा. सरकारी अभियोक्ता स्वाती निकम यांनी कायदयातील तरतूदींवर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. ए. शेख यांनी विधी सेवा प्राधिकरणातर्फे राबविले जाणारे उपक्रम आणि विविध योजनांची माहिती उपस्थित श्रोत्यांना अवगत करुन दिली.

सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचालन न्यायालयीन कर्मचारी बी. जी. नाईक आणि त्यांची कन्या देवयानी नाईक यांनी केले. आभारप्रदर्शन मनपा उपायुक्त शाम व्ही. गोसावी यांनी केले.

या कार्यक्रमास मनपा उपायुक्त शाम व्ही. गोसावी, सहा. आयुक्त अभिजित बावीस्कर, प्रमुख वैद्यकीय अधिकारी रावलानी, डॉ. नेहा भारंबे आणि डॉ. घोलप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमास संमातर विधी सहायक आरीफ पटेल, आरोग्य विभाग आणि दवाखाना विभागातील कर्मचारी महिला, अंगणवाडी सेविका आणि बालवाडी विभागातील महिला यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.