सावधान..! : आता महाविद्यालयात जीन्स, टी-शर्टवर बंदी..

काहीही परिधान केलं तर... : हा दिला इशारा

0

 

मुंबई 

राजधानी मुंबईत चेंबूर येथील एन.जी. महाविद्यालयाने घातलेली नकाबबंदी योग्य असल्याचा निर्णय २६ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर आता या महाविद्यालयात  जीन्स आणि टी शर्ट दोहोंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा धक्काच बसला आहे.

चेंबूरमध्ये असणाऱ्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये हिजाबनंतर आता जीन्स, टी-शर्टवर बंदी घातल्याच्या कॉलेज प्रशासनाच्या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट घालून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे. कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे.

 

महाविद्यालय प्रशासनाने यापूर्वी हिजाबवर बंदी घातली होती. दरम्यान  या निर्णयाविरोधात विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती याचिका न्यायालयाने फेटाळली. आणि महाविद्यालयाने घातलेली नकाबबंदी योग्य असल्याचा निर्णय दिला.

यानंतर आता कॉलेजकडून नवा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील या महाविद्यालयाच्या प्रशासनाने २७ जून रोजी जारी केलेल्या ड्रेस कोड आणि इतर नियमानुसार फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, उघडे कपडे आणि जर्सीला परवानगी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये फॉर्मल आणि सभ्य पोशाख परिधान करावं असं म्हटले आहे.

प्राचार्यांच्या सहीने असलेल्या नोटीसमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात फॉर्मल पोशाख घालावा. हाफ शर्ट, फुल शर्ट आणि पँट घालण्यास मनाई नाही. मुली कोणताही भारतीय पोशाख वापरु शकतात. धर्म दर्शवणारा एकही पोशाख कुणीही परिधान करु नये. मुलींनी जर अशा प्रकारचे बुरखा, नकाब, टोपी, स्टोल असं काहीही परिधान केलं असेल तर ते कॉमन रुममध्ये जाऊन काढून टाकण्यात येईल असंही या नोटीस स्पष्ट करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना मात्र यामुळे चांगलच धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.