मराठा आंदोलनामुळे एसटीचे तब्बल १५ कोटींचे नुकसान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जालन्यातील लाठीमाराच्या घटनेनंतर मराठा समाज आक्रमण झाल्याने एसटी बसचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने काही ठिकाणी बससेवा तात्पुरती बंद केली. यामध्ये गेल्या तीन दिवसात छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, जळगाव आणि बीड या मार्गावरील बस सेवा बंद आहे. यामध्ये ३० हजार फेऱ्या रद्द झाल्या. रद्द फेऱ्यांमुळे सरकारला १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा फटका २८ ते ३० हजार प्रवाशांना बसला आहे.

मराठा आरक्षण आंदोलन सध्या चिघळतांना दिसत आहे. यामुळे  बसेस जाळपोळीच्या घटना राज्यभर होतांना दिसत आहे.  या घटनेनंतर तीन दिवसांपासून जिल्ह्यातून मराठवाड्यासह पुणे, सोलापूर, बीड, लातूरकडे जाणाऱ्या सर्व बसफेऱ्या थांबविण्यात आल्या आहेत. सोमवारीही दिवसभरातील 42 फेऱ्या रद्द केल्या. परिणामी शेकडो प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

एसटीने सर्व विभाग नियंत्रकांना पोलिस यंत्रणेच्या संपर्कात राहण्याचे आदेशही दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन मगच डेपोतून एसटी काढावी, अशाही सूचना मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सकाळपासूनच या मार्गावरील एकही बस आगाराबाहेर पडली नाही. मात्र अन्य मार्गावरील कुठल्याही बसफेऱ्यांमध्ये कपात केली नसल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.