बापरे ! ग्रामपंचायतीजवळ शस्त्राचा धाक दाखवून रोकड लुटली

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

एकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून खिशातील ३ हजार रुपयांची रोकड जबरी हिसकावून नेल्याची घटना जळगाव तालुक्यातील आसोदा गावात असलेल्या ग्रामपंचायती जवळ शुक्रवार १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) तिघे राहणार असोदा या संशयित आरोपीवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक बिऱ्हाडे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार 14 जून रोजी सायंकाळी सहा वाजता ते असोदा ग्रामपंचायत जवळ बसले होते. तेव्हा गावातील वैभव विजय सपकाळे (कोळी) हा मोटार सायकलवर वाल्मीक यांच्याजवळ आला. त्यावेळी त्याच्या जवळील मोटार सायकलवर गावातील कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) असे मागे बसलेले होते. तेव्हा वैभव विजय सपकाळे याने वाल्मीक 1 हजार रुपयाची मागणी केली. तेव्हा त्यावेळी वाल्मीक यांनी माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने कल्पेश निलेश इंगळे (माळी) याने त्याचे पॅन्टच्या कमरेला लपवुन ठेवलेले एक काही तरी मोठे धारधार हत्यार काढले व वाल्मीक यांच्या मानेला लावला. व पैसे देतो का , नाहीतर तुला या हत्याराने मारुन टाकु अशी धमकी दिली.

दरम्यान वैभव विजय सपकाळे वाल्मीक यांच्या खिशातून तीन हजार रुपयांची रोकड काढून हिसकावून घेतले. त्यावेळी सदर ठिकाणाजवळून जाणारे गावातील शरद पंढरीनाथ नारखेडे यांनी सदरचा प्रकार पाहून सदर तिन्ही लोकांना हे काय करता आहेत असा जाब विचारला असता त्यांना देखील वरील इसमापैकी दिपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे याने ‘तु इथून चालला जा नाहीतर तुला देखील येथेच आडवा पाडू’ अशी धमकी देत वरील तिन्ही इसम हे मोटार सायकलने सदर ठिकाणाहून निघून गेले.

या घटनेनंतर वाल्मीक बिराडे यांनी जळगाव तालुका पोलिसात अर्जुन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दिपक पुंडलिक सपकाळे (कोळी) तिन्ही रा.असोदा ता जि जळगांव यांचे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.