तरुणाला चाकूचा धाक दाखवून मोबाइलसह पैसे लुटले; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तरूणाला चाकूचा धाक दाखवून मोबाईलसह रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना राष्ट्रीय महामार्गावरील हुंडाई शोरूमजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील शिव कॉलनी येथील रहिवासी असलेला तरुण अनुभव सौरभ नायक (वय २६) हा मार्केटींग डायरेक्टर म्हणून काम करतो. बुधवारी ६ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान अनुभव नायक हा राष्ट्रीय महामार्गावरील हुंडाई शोरूमजवळून जात असतांना अज्ञात दोन जण दुचाकीवर आले. यातील दुचाकीच्या मागे असलेल्या एकाने अनुभवला चाकूचा धाक दाखविला आणि खिश्यातील १० हजाराचा मोबाईल आणि ७०० रूपयांची रोकड असा एकुण १० हजार ७०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरून नेला.

याप्रकरणी अनुभव नायक याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.