बनावट कागदपत्रे करून प्लॉटची परस्पर विक्री; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील मेहरुणमधील प्लॉटची विक्री बाबत बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची परस्पर विक्री करण्याच्या प्रकरणात जगन रामचंद नारखेडे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शहरातील मेहरुणमधील प्लॉटची विक्री करण्यासाठी बनावट आधार कार्ड आणि पॅनकाडचा वापर करून दुसर्‍या व्यक्तीला उभे करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश मांगीलाल बाफना (रा. सुयोग कॉलनी) यांच्या मालकीचा जळगाव शहर महापालिका हद्दीत मेहरूणमधील शेत सर्व्हे क्रमांक १६३/१ ‘ब’ मधील बखळ प्लॉट क्रमांक १७ असून त्याची किंमत ३५ लाख रुपये आहे. हा प्लॉट इम्रान मुख्तार तांबोळी (रा. प्लॉट क्रमांक ४५, इंद्रप्रस्थनगर, एमआयडीसी) याने खरेदी केलेला आहे. त्याबाबत दुय्यम निबंधक जळगाव- १ यांच्याकडे तसा दस्त क्रमांक ७५६/२०२१ नुसार खरेदीखत नोंदवून प्लॉट खरेदी केला आहे. बाफना याच्या प्लॉटवर त्याचे नाव लावलेले आहे.

खरेदीखत करताना अरुणा दिलीप चौधरी (वय ५२, रा. एलआयसी कॉलनी) व फारुख शेख रहेमदुल्ला खाटीक (वय ४७, रा. मास्टर कॉलनी) यांनी हजर राहून खरेदी लिहून घेणार व लिहून देणार यांना ओळखतात, अशी खोटी माहिती सांगून त्यांनी सर्वांनी संगनमताने बाफना यांच्या नावाचे आधारकार्ड व पॅनकार्ड बनावट तयार केले. ते खरे असल्याचे भासवून त्या कागदपत्रानुसार बाफना यांच्या प्लॉटची खरेदी करून फसवणूक केली होती.

सदर प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अरुणा चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. त्या सद्य:स्थितीत कारागृहात आहेत. दरम्यान याच प्रकरणी आता जगन रामचंद नारखेडे (वय ४२, रा. भालेगाव, ता. मलकापूर, जि. बुलडाणा) याला अटक करण्यात आली आहे. त्याला मलकापूर येथून अटक करण्यात आलेली आहे.सदर कारवाई सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, मुदस्सर काजी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे यांच्या पथकाने पार पाडली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.