जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मार्फत जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त  मध्यवर्ती कारागृहातील कैदी बांधवासाठी मनोरंजनाच्या  माध्यमातून प्रबोधन, जनजागृती आणि मार्गदर्शन करणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव अधिक्षक आर. आर. देशमुख यांनी प्रस्तावना करताना या कार्यक्रमा मागील शासनाची भूमिका आणि कैदी बांधवांमध्ये होणारे सकारात्मक अपेक्षित बदल याबाबत माहिती दिली.  प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले न्यायाधीश  तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगावचे  सचिव  ए. एस. शेख यांनी मनोगत व्यक्त करत आवाहन केले की,  या जेलमधून बाहेर जाऊन एक चांगला व्यक्ती म्हणून समाजात व आपल्या परिवारात ओळख निर्माण करावी व झालेल्या चुकांची सुधारणा करून चांगले आयुष्य जगावे.

मुख्य शासकीय अभिवक्ता तथा जिल्हा जळगाव वकील संघाचे अध्यक्ष केतन ढाके यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या व  कैदांचे मनोबल वाढवले. कैदी बांधवांमध्ये  सकारात्मक बदल  होऊन भविष्यात गुन्हेगारी वृत्तीपासून दूर राहून  इतरांना सहकार्य करण्याची भावना मनात ठेवणे आणि एक उत्तम माणूस म्हणून कुटुंबांसोबत आनंदी जीवन जगण्याचे प्रबोधन तसेच हे  परमेश्वराने आपल्याला दिलेले आयुष्य हे अतिशय सुंदर आहे आणि ते  प्रामाणिकपणे व  जबाबदारीने जगावे जेणेकरून आपणा सोबत परिवाराला ही आनंदी ठेवता येईल असे प्रबोधन  समुपदेशक तज्ञ गनी मेमन यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव येथे कैदी बांधवामध्ये देशाबद्दल प्रेम देशभक्ती जागृत व्हावी, भारताची  संस्कृती कलेच्या माध्यमातून माहिती देणे, स्वागत गीत, शास्त्रीय नृत्य, देशभक्तीपर गीते, क्रांतिकारी गीते, महाराष्ट्राची लोकधारा, लावणी, वासुदेव भारुड, वहिगायन, लोकगीते, योगा प्रात्यक्षिक, भारतीय स्वातंत्र चळवळीचे क्रांतिकारी व समाज सुधारक याच्या जीवनावर आधारित शायरी पोवाडातून कैदी बांधावाचे प्रबोधन करण्यात आले.   यानंतर कैदी बांधवमधील काहींनी देशभक्ती पर गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे मने जिंकली. ज्या कैदी बांधवांनी सादरीकरण केले याचा विशेष सत्कार करण्यात आला.

जीवन गाणे गातच जावे, संस्कृती, देशभक्ती,  प्रबोधन  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. आनंद लिमये यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तुरुंग प्रशासनाला आदेश देऊन सहकार्य करण्याबाबत कळविले. अप्पर पोलिस महासंचालक,  महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा पुणे सुनील रामानंद यांनी वैयक्तिक रित्या लक्ष घालून याबाबत  योग्य ते निर्देश दिले. हेमंत पवार  जनसंपर्क अधिकारी कारागृह व सुधार सेवा यांनी याबाबत योग्य तो समन्वय ठेऊन कार्यक्रम यशस्वी ठेवण्यासाठी सहकार्य केले.

संदीप शेंडे, संदीप पाटील, चंद्रकांत पाटील याचे आभार अधिक्षक आर. आर. देशमुख यांनी केले. उत्कृष्ठ नियोजन केल्याबद्दल  न्यायाधीश  ए. एस. शेख   यांच्या वतीने जिल्हा समन्वयक स्वप्नील वाघ व  कार्यक्रम समन्वयक उज्ज्वला वर्मा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात सहभागी कलाकर म्हणून अप्पा नेवे, संजू सूर्यवंशी,  संग्राम जोशी, संदीप जोशी,  प्रवीण महाजन, गायत्री ठाकूर, दर्शना वर्मा, सेजल वर्मा, मयूर अहिरराव, संहिता जोशी तसेच साऊंडचे काम महेश चिरमाडे यांनी पाहिले. या सर्वांचे स्वागत आभार जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव अधिशक आर. आर.  देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले व  राष्ट्रागीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.