जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शिरसोली अप रेल्वे लाईनवरील धानोरा शिवारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. एस.बी. सनस (उप स्टेशन प्रबंधक, जळगव) यांनी दिलेल्या खबरीनुसार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
तरुणाचे वय अंदाजे 30 ते 35 वयोगटातील आहे. 2 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेल्या अकस्मात मृत्यू प्रकरणातील मयत अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. रंगाने सावळा, अंगाने मध्यम असलेल्या या तरुणाची दाढी बारीक वाढलेली असून तो निर्वस्त्र स्वरुपात आढळून आला आहे. हा घातपात आहे की अपघात याबद्दल चर्चा सुरु आहे. धावत्या ट्रेनच्या धक्क्याने तो मयत झाला आहे की त्याला कुणी मयत व निर्वस्त्र अवस्थेत रेल्वे लाईनवर आणून टाकले याबाबत चर्चा सुरु आहे.