राज्यात लवकरच 7231 पदांसाठी पोलीस भरती; गृहमंत्र्यांचे आदेश

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या पोलीस दलातील भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली होती. राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचं ते म्हणाले होते.

2019 मधील पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 च्या भरती प्रक्रियेतील 5297 उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षणाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. जूनी पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानं आता 7231 पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आहे. तसे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले असल्याचं कळतंय. पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती प्रक्रिया सुरु होण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी काढलेल्या आदेशामुळं पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.

2019 ची पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या द्वारे 5297 पोलिसांची पदं भरण्यात आली आहेत. निवड झालेल्या उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षणाला 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. नवी पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 7231 पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.

गृह विभाग राबवणार पोलीस भरती

सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्यानं स्वत: पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.

पोलीस भरती टप्प्याटप्प्यानं होणार

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात 5200 पदांची भरती सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलीस भरण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन कार्यवाही सुरु करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.