जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रोजी रोटरी हॉल गणपती नगर जळगाव येथे 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला पर्यावरण सखी मंच व जॉइंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कुमार चिंथा साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक जळगाव उपविभाग जळगाव हे अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनुराधा अभिजीत राऊत व महापौर जयश्री महाजन तसेच पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्ष मनिषा पाटील हे उपस्थित होते. तसेच संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण करणारे परीक्षक कलाशिक्षक राजेंद्र पाटील नूतन मराठा, सुनील दाभाडे मानवसेवा विद्यालय हे उपस्थित होते.

परीक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले की, जवळजवळ स्पर्धेचे पाचशेच्या आसपास चित्र हे प्राप्त झाले.  सर्वांचे चित्र हे सुंदर संदेशात्मक पर्यावरणावर आधारित तसेच दिलेल्या विषयानुसार असल्याने परीक्षण करणे म्हणजे कसोटीस ठरली. यातून उत्कृष्ट 15 चित्रांची निवड करण्यात आली. यात खालील विजेते घोषित करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते एक रोप व ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यात पुढील विद्यार्थी एक कौतुकास्पद अभिनंदनस्पद ठरले.

गट क्रमांक एक(१ ली ते ३ री) प्रथम आराध्या जितेंद्र पाटील, द्वितीय श्रीनिधी कोळेकर, तृतीय उत्कर्ष जाधव जयंत, उत्तेजनार्थ स्वरा मनोज, पवार हिमानी बी झोपे.

गट क्रमांक दोन ( ४ थी ते ६ वी) प्रथम दिव्यश्री महेश बोरसे, द्वितीय पारस प्रदीप पाटील, तृतीय निकेश दिनेश जाधव, उत्तेजनार्थ कृतिका कृष्णा माळी, धनश्री भीमसेन महाजन.

गट क्रमांक तीन (७ वी ते ९ वी) प्रथम निकिता देवराज पाटील, द्वितीय संजीवनी दिवाकर कलास्कर, तृतीय लीना विजय पाटील, उत्तेजनार्थ संस्कृती कपिल घुगे, राजस धनंजय चौधरी हे ठरले.

याप्रसंगी पालक वर्ग ही आपल्या पाल्याचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. कुमार चिंता साहेब यांनी वृक्षरोपण तर करावेच परंतु त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे, हे सांगून चित्रातून जो संदेश समाजाला विद्यार्थ्यांनी दिला तो रुजला तर खरोखर वसुंधरा ही सुंदर होईल पर्यावरणाची हानी होणार नाही.  असे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून सांगितले.

यासोबतच डॉक्टर अनुराधा राऊत यांनी बालपणापासून जर कला जोपासली तर एक सुंदर व्यक्तिमत्व घडते आणि लहान बालकांनी तर आपल्या कलेत अधिकाधिक उत्कृष्टपणा कसा येईल याकडे लक्ष द्यावे व कलेचे संवर्धन करावे असे मार्गदर्शन केले.  महापौर जयश्री महाजन यांनी देखील प्रत्येकाने आपली कला विकसित करावी आणि हा छंद जोपासावा. कला ही माणसाला जीवन जगणं शिकवते आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कलेमध्येही पारंगत व्हावे आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक मनीषा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले.  आभार आशा मौर्य यांनी मानले.  याप्रसंगी महिला पर्यावरण सखी मंच व जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी महिला पदाधिकारी रेणुका हिंगु, नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी, नेहा जगताप, भाग्यश्री महाजन, गायत्री चौधरी, डॉक्टर नीलिमा सेठीया व इतर महिला सखी उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.