जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेट महाविद्यालयातील “गणरायाला भव्य मिरवणुकीने निरोप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात असंख्य विध्यार्थी भक्तांच्या उपस्थितीत रंगीबेरंगी फुलांनी, विद्युत रोषणाईने सजलेल्या रथातून जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या गणरायाला सातव्या दिवशी भावपूर्ण निरोप देण्यात आला. अभियांत्रिकी इमारतीच्या परिसरात सात दिवसापूर्वी गणरायाची भक्तिभावात प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या स्थळी रोज गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी कनिष्ट महविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, प्राध्यापक, प्रध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्याच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सजवलेल्या रथात विराजमान झालेल्या बाप्पाचा रथ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर चोहोबाजूंनी फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाचे तसेच जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे विध्यार्थ्यांच्या ढोल पथकातील लेझीम आणि झांजपथक नेहमीप्रमाणे मिरवणुकीच्या अग्रस्थानी होते. युवकांसह युवतींचाही तेवढाच समावेश असलेले ध्वज पथक व ताशा पथकांनी वातावरणात चांगलाच रंग भरला होता. मिरवणुक मेहरूण तलाव येथे आल्यावर तेथे आरती करण्यात आली व त्यानंतर गणरायाचा रथ विसर्गस्थळाकडे रवाना झाला. या महाविद्यालयीन गणेशोत्सवासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या अॅचीव्हर्स टीमने सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.