जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलच्या संचालिका राजुल रायसोनी यांची स्पर्धेला भेट; बक्षीस वितरण समारंभ उद्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालय व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत आजच्या तिसऱ्या दिवशी सहाव्या फेरी अखेर सहा गुणांसह प्रियांशू पाटील नागपूर, वीरेश शरणार्थी पुणे, मानस गायकवाड सोलापूर, ओमल मकाने पुणे, अनिकेत बापट सातारा हे आघाडीवर आहेत. तर पाच गुणांवर आशिष चौधरी अहमदनगर, आदित्य सावळकर कोल्हापूर,कार्तिक सिंग नाशिक, अर्णव कोळी ठाणे, गणेश ताजने नाशिक आपले आव्हान टिकुवन आहेत. सदर स्पर्धा शिरसोली मार्गावरील जी. एच. रायसोनी महाविद्यालयात २० ते २३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली असून, सहाव्या फेरीची सुरुवात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलच्या संचालिका राजुल रायसोनी यांच्या हस्ते करण्यात आली. सोबत जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, स्वप्निल बनसोड प्रवीण ठाकरे, क्रीडा संचालक जयंत जाधव, रवी शर्मा, राहुल धुळनकर, ममता प्रजापत उपस्थित होते.

आजच्या सकाळच्या पाचव्या फेरीत आघाडीवर असलेल्या कोल्हापूरचा श्रीराज भोसले व साताऱ्याचा अनिकेत बापट यांचा डाव हा बरोबरीत सुटला. तर दुसरा पटावर नागपूरच्या प्रियांशु पाटील याने मुंबईच्या योहान बोरीचा याचा पराभव केला तर, तिसरा पटावर पुण्याच्या वीरेश शरणार्थी याने पुण्याच्याच किरण पंडितराव यांचा पराभव करीत स्पर्धेत आघाडी मिळवली. सहाव्या फेरीत पुण्याचा वीर शरणार्थी व नागपूरचा प्रियांशू पाटील यांच्यात उशिरापर्यंत सुरू असलेल्या डाव, तर दुसरा पटावर सोलापूरच्या मानस गायकवाड याने आपल्यापेक्षा अधिक मानांकन असलेला श्रीराज भोसले याचा पराभव करीत स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली. तर तिसरा पटावर पुण्याच्या ओमलमकाने याने मुंबईच्या संजीव मिश्रा याचा पराभव केला. स्पर्धा एकूण आठ फेऱ्यात होणार आहे. स्पर्धेच्या सातव्या फेरीची सुरुवात सकाळी ८.३० वाजता होणार आहे. तर आठवी फेरी दुपारी १.३० ला होणार होणार आहे.तसेचग स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उद्या संध्याकाळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.