जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा विजय; गुलाबराव पाटलांना धक्का

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

बाजार समिती निवडणूक ही मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखली जाते कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे मतदान असते. जळगाव (Jalgaon) तालुका बाजार समितीत सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळाले आहेत. यामुळे अगदी प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांना पराभवाचा धक्का बसला आहे तर माजी मंत्री गुलाबराव देवकर (Former Minister Gulabrao Deokar) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने विजय संपादित केला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. आतापर्यंत हाती आलेल्या महाविकास आघाडीला 11 जागा मिळाल्या आहेत. सहा जागांवर शिंदे भाजपा निवडून आले आहेत. एक जागा ही अपक्ष म्हणून निवडून आली आहे. महाविकास आघाडी ने आपल्या पदरात ११ जागा निवडून आणल्या आहेत तर महायुतीला म्हणजेच शिंदे भाजपला जोरदार धक्का देत त्यांना केवळ सहा जागी निवडून येता आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.