महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या तर नक्कीच आत्मनिर्भर जगू शकतील: रमया राजकुमार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’, या पुरुषप्रधान संस्कृतिप्रिय वाक्‍याला मागे टाकत त्याच स्त्रीने पुरुषांनाही “ओव्हरटेक’ केले आहे. आपणही पुढे जायचे. या जिद्दीने, चिकाटीने आणि आत्मनिर्भर होण्याच्या ऊर्मीने ती धडपड करते आहे. ती व्यवसायात पाय रोवून उभी राहिली आहे. स्वतःतील कलाकौशल्यांना तिने पंख दिले आहेत. नवयुगात ती व्यावसायिक होते आहे, इतर महिलांच्या हातालाही काम देते आहे. महिला आरोग्य, फिटनेस, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांत ती काम करते आहे. असे मार्गदर्शन सॉफ्ट स्कील ट्रेनर व प्रसिध्द साइकोलॉजिस्ट रमया राजकुमार यांनी ता.८ बुधवार रोजी जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात ‘जागतिक महिला दिन’ अंतर्गत सुरु झालेल्या महिला सन्मान सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.

महाविद्यालयात महिला दिनानिमित्त संपूर्ण सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या उपस्थित होत्या. त्यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, महिला ग्रामीण भागातील असो की शहरातील, घराबरोबरच घराबाहेरची कामे करून घराला हातभार लावण्याचे काम ती आजही न बोलता करत असते. घर, ऑफिस आणि मुलांच्या संगोपनात स्वतःला वाहून घेते मात्र आजही समाजाचे ऋण फेडण्यासाठी ती न बोलता पुढाकार घेत असते, तर कधी जबाबदारीचे भान ठेवत कर्तव्य बजावत असते मात्र हे सर्व करताना तिची तारेवरची कसरत आजपर्यंत काही थांबलेले नाही. त्यामुळे प्रत्येक युवतीने आपल्या आईचा-आजीचा आदर्श घ्यायला हवा. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीचे स्थान सर्वप्रथम आहे. तिच्याविना ह्या जगात काहीही शक्य नाही. जर घरातील स्त्री पाठीशी उभी नसेल तर संसार उभा राहणे सोडा, प्रगती साधणे देखील दिवास्वप्नच. आणि जर तुम्ही नशीबवान असाल तर आई, आजी, बायको, मुलगी आणि सखी अशा कित्येक स्वरुपात ती नेहमीच तुमच्या सोबत असेल आणि त्यानंतर आपली स्वप्नपूर्ती ठरलेली असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात रमया राजकुमार म्हटल्या कि, महिलांनी स्वाभिमानी असावे. त्यासाठी आत्मविश्वास असायला हवा. आत्मविश्वासासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे, तसेच महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतील, तर त्या अधिक आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्यास सक्षम होतात, त्यामुळे महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे फार आवश्यक आहे, भारताला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर भारतातील महिलांना सुरक्षा प्रदान करणे गरजेचे आहे. त्यांना आत्मविश्वास आणि त्यांच्यातील गुणांची जाणीव करून देणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच महिलांनी ‘आपल्या उद्दिष्टापासून विचलित होवू नका, आपल्या धेय्यावर ठाम रहा’ असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्योती जाखेटे यांनी केले. तर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.