जळगावच्या डॉक्टर प्रियंका सोनी-प्रीत यांना दिल्लीत “काव्य श्री सन्मान”

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अंतरराष्ट्रीय शब्द सृजन द्वारे दिल्लीच्या बॅनर खाली हिंदी भवन दिल्लीच्या ऑडिटोरियम मध्ये ‘गोल्डन बुक आफ रेकॉर्ड’ मध्ये दर्ज पुस्तक अशोक चक्र विजेताच्या लोकार्पण समारंभ मध्ये आपल्या जळगावच्या सुप्रसिद्ध देश-विदेशात आपल्या लेखनाच्या माध्यमातून ओळख करणारी लेखिका, कवियत्री व साहित्यकार आदरणीय डॉ.प्रियंका सोनी-प्रीत यांना काव्य लेखनासाठी “काव्य श्री सन्मान” देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानाचा मुख्य उद्देश्य अशोक चक्र प्राप्त विजेत्यांवर छंद आणि दोहा लेखन करणे होते. या कार्यक्रमात दोहा सामूहिक संग्रह पुस्तकाच्या विमोचनाचे खास आकर्षण होतं.

प्रत्येक साहित्यकारांना वेगवेगळ्या अशोक चक्र विजेत्यांना नाव दिले गेले होते. त्यात डॉक्टर प्रियंका सोनी यांना ‘श्री निर्भय सिंह सिसोदिया’ यांचे नाव दिले गेले होते. प्रियंका सोनी यांनी श्री निर्भय सिंह सिसोदिया यांच्या नावावर दोहा लिहला होता. अशोक चक्र विजेता पुस्तक दोहा छंद द्वारे लिहिले गेले असून या ऐतिहासिक काळाच्या संकलन आणि आयोजन विश्वस्तरीय संस्था आंतरराष्ट्रीय शब्द सृजन संस्था दिल्ली द्वारे करण्यात आले होते. या मध्ये आपल्या देशाचे १५० साहित्यकारानां सन्मानित करण्यात आले. या मध्ये जळगावच्या डॉ. प्रियंका सोनी “प्रीत” यांना सेनेचे ‘रिटायर्ड लेफ्टिनेन्ट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी’ आणि ‘ब्रिगेडियर भुवनेश चौधरी’ यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात कवी कुमार विश्वास यांचे वडील वरिष्ठ साहित्यकार ‘चंद्रकांत शर्मा’ सोबत अनेक साहित्यिक आणि सैनिक क्षेत्राचे इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच फिल्म जगतातले गीतकार, गझलकार व दिल्ली हिंदी साहित्य अकादमीचे अध्यक्ष इंद्रा मोहन कार्यक्रमाला उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सदन गाजियाबाद चे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजीव कुमार पांडे व संरक्षक ओंकार त्रिपाठी यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम पार पडला. भारताचे अशोक चक्र विजेत्यांवर दोहा संग्रह पुस्तकाचा भव्य लोकार्पण झाला तेव्हा, पूर्ण सभागृहात भारत माता च्या जयघोष करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.