गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनच्या तालुकाध्यक्ष पदी जगदीश कवडीवाले यांची नियुक्ती

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्यस्तरीय गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनच्या यावल तालुकाध्यक्ष पदी यावल येथील सोने चांदीचे प्रसिद्ध व्यापारी जगदीश कवडीवाले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सोने चांदी व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव व यावल शहरातील अनेक बँकाचे सोने तारण व्हॅल्यूएशनचा अनेक वर्षांचा अनुभव बघता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय महाराष्ट्र गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, उपाध्यक्ष नचिकेत भुर्के, संघटक भैया भाऊ भामरे यांच्या सयुंक्तिक स्वाक्षरीने जारी नियुक्ती पत्रा द्वारे करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे सर्व सोने चांदी व्यापाऱ्यांनी सर्वत्र अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.