केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याने पाठवली ISI ला आर्मीची गुप्त माहिती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असलेला कर्मचारी पाकिस्तानला भारतीय लष्कराची माहिती देत होता. मॉस्कोत कार्यरत असलेला हा कर्मचारी २०२१ पासून आयएसआयला माहिती पुरवत होता. त्याला उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली आहे. मेरठमध्ये ही कारवाई करण्यात आली. सतेंद्र सिवाल नावाच्या या एजंटने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आयएसआय एजंट असलेला सतेंद्र हा मॉस्कोतील भारतीय दुतावासात इंडियन बेस्ड सिक्योरिटी असिस्टेंट (IBSA) पदावर कार्यरत होता.

एटीएसला इनपुट मिळाले आणि…
आयएसआय एजंट झालेला सतेंद्र यांच्यासंदर्भात उत्तर प्रदेश एटीएसला इनपुट मिळाले होते. आयएसआय परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसह आहि ट्रॅप आणि पैशांचे आमिष देऊन माहिती घेत होती. त्यानंतर एटीएसने तपास सुरु केला. त्यात सतेंद्र सिविल हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला माहिती देत असल्याने समोर आले. त्याने भारतीय लष्काराची गुप्त माहिती पुरवली होती. उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये राहणार सतेंद्र याची नियुक्ती मॉस्कोतील भारतीय दुतावासात करण्यात आली होती. त्याला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून दोन मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त करण्यात आले.

अनेक गोपनीय माहिती पाठवली
यूपी एसटीने दिलेल्या माहितीनुसार, सतेंद्र सीवालला ताब्यात घेऊन चौकशी केली. तो अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही. त्याच्याकडे करून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुंह्याची कबुली दिली. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला आपण गोपनीय माहिती पाठवत असल्याचे त्याने मान्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.