IPL 2023; हैदराबाद ने जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

आयपीएल (IPL) सुरु झाली असून आज इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील चौथा सामना खेळवला जात आहे. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आमनेसामने आहेत. हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणे आमच्यासाठी योग्यच असल्याचे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) म्हटले. एकूणच सॅमसनच्या म्हणण्यानुसार, राजस्थानला देखील नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची होती. त्यामुळे भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन सॅमसनच्या देखीस मनासारखा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स आणि आदिल राशिद हे खेळाडू सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून पहिलाच सामना खेळत आहे. तसेच जेसन होल्डर आणि केएम आसिफ राजस्थान रॉयल्ससाठी पदार्पणाचा सामना खेळत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.