बंपर भरती ! इंडियन ऑइलमध्ये 1820 रिक्त पदे, असा करा अर्ज

0

लोकशाही नोकरी संदर्भ 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने बंपर भरती जाहीर केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रे़ अप्रेंटिसच्या जागांसाठी ही भरती जाहीर केली आहे.  1820 अर्ज मागवले जात आहे. ही भरती अनेक राज्यासह केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी http://IOCL iocl.com च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करु शकतात. अजून ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली नसून लवकरच अर्जाची लिंक ओपन होणार आहे. 16 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात.

राज्यानुसार पदे 

महाराष्ट्र – 252 पदे, दिल्ली – 138 पदे, हरियाणा – 82 पदे, पंजाब – 76 पदे, हिमाचल प्रदेश – 19 पदे, चंदीगड – 14 पदे, जम्मू आणि काश्मीर – 17 पदे, राजस्थान – 96 पदे, उत्तर प्रदेश – 256 पदे, उत्तराखंड – 24 पदे, पश्चिम बंगाल –  252 पदे, बिहार – 87 पदे, ओडिशा – 87 पदे, झारखंड – 41 पदे, आसाम – 115 पदे, सिक्कीम – 4 पदे, त्रिपुरा – 6 पदे, नागालँड – 3 पदे, मिझोराम – 1 पदे, मेघालय – 1 पदे, मणिपूर – 4 पदे, अरुणाचल प्रदेश – 4 पदे, अंदमान आणि निकोबार बेटे – 5 पदे, गुजरात – 95 पदे, मध्य प्रदेश – 52 पदे, गोवा – 6 पदे, छत्तीसगड – 24 पदे, दादरा आणि नगर हवेली – 2 पदे, दमण आणि दीव – 3 पदे, तामिळनाडू आणि पाँडिचेरी – 30 पदे, कर्नाटक – 20 पदे

 

अशी असेल निवड प्रक्रिया

ऑनलाइन परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर आणि पात्र असलेल्या उमेदवारांची निवड केली जाईल. ऑनलाइन परिक्षेतील सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असतील. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले जातील. ऑनलाईल परिक्षेत यशस्वी उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन राउंडमध्ये सहभागी व्हावे लागेल. या जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 16 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.