प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार

0

लोकशाही न्युज नेटवर्क
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसीभारत दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांचा हा तिसरा भारत दौरा असून या दरम्यान भारत आणि इजिप्तमध्ये वेगवेगळे करार होणार आहेत.

राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान या दोन देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. 26 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या सोहळ्याला ते उपस्थित राहतील आणि विविध उद्योग प्रतिनिधींशी संवादही साधतील. द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्यादरम्यान चर्चा होणार आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.