इंदापूर विहिरीत अडकलेल्या ४ मजूरांचा मृत्यू , ७० तासानंतर शोध मोहीम संपली

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इंदापूर येथे विहिरीचं काम सुरु असतांना अपघात घडला. मातीच्या ढीगाऱ्याखाली चार मजूर दबले जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. त्या चारही मजुरांचा मृतदेह सापडला आहे. पहिला मृतदेह तब्बल ६५ तासांनी सापडला तर, त्यानंतर २ तासांनी आणखी दोन मजुरांचा मृतदेह हाती लागले आहे. तब्बल ६७ तासांनी दोन मृतदेह सापडले आहे. तर ७० तासांनी चौथ्या मजूराचाही मृतदेह सापडला आहे. त्यामुळे अखेरीस ७० तासानंतर एनडीआरएफचं शोधकार्य थांबवण्यात आलं आहे.

माती विहिरीत पडल्याने ४ जण अडकले
सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण आणि मनोज मारुती चव्हाण हे कामगार त्या ठिकाणी विहिरीचं रिंगण मारण्याचं काम करत होते. अचानक त्याच्यावरती हा मॉब आणि विहिरीचा स्लॅब कोसळला आणि त्या ढीगाऱ्याखाली हे मजूर कालपासून अडकले होते. ज्यावेळी चार लोक नेहमीप्रमाणे आपल्या घरी परतले नाही, तेव्हा शोध मोहीम सुरु झाली. आणि हा शोध शेवटी त्या विहिरीजवळ येउन थांबला. त्या ठिकाणी त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या. मात्र ते चार लोक आणि त्यांचे मोबाईल लागू शकले नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी ढीगाऱ्याखाली बेपत्ता चार लोक अडकल्याची भीती व्यक्त केली होती.

इंदापूर विहिरीचे काम बेकायदेशीर
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरु असतांना मातीचा मलबा कोसळून चार जण मातीखाली दबले असल्याने प्रशासनाच्या वतीने शोध सुरु होती. दुर्घटनेत अडकलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले आहेत. विहिरीचे कामे बेकायदेशीर असून या मालकाने चार कुटुंबांचा जीव धोक्यात घातला, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बेलवाडीच्या महिला सरपंच मयुरी जामदार आणि नागरिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.