हिरकणी बुरुजावर अडकले दोन तरुण, गावकऱ्यांच्या मदतीने सुटका

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित आज देशभरात मोठा उत्साह आहे. अनेकजण शिवज्योत घेऊन परतत आहेत. दरम्यान शिवज्योत घेऊन परतत आहेत. दरम्यान शिवजयंती दिनी किल्ले रायगडावरील हिरकणी कट्ट्यावर अडकलेल्या दोन युवकांना हिरकणी वाडीतील ग्रामस्थांनी सुखरूप गावात आणले आहे.

हिरकणी या बुरुजावरुन दोन युवकांनी किल्ला उतरण्याचा प्रयत्न केला. अत्यंत अवघड अशा कड्यावरुन उतरताना हे दाेन्ही युवक एका ठिकाणी अडकले. त्यांना किल्ल्यावरदेखील परत जाता येत नव्हते आणि किल्ल्यावरुन खाली उतरता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी एका दगडाचा आधार घेत तेथेच थांबणे पसंत केले.

आज सकाळी रोप वेच्या मदतीने जातांना स्थानिकांनी या युवकांना पहिले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. दोघेही कड्यावर अडकल्याचे समजताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. रायगडाच्या हिरकणी कड्यावर अडकलेल्या दोन्ही युवकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टिम दाखल झाली.

या दोन्ही युवकांना हिरकणी वाडीतील स्थानिकांनी सुखरूप किल्ल्यावरून खाली आणले. या युकांच्या डोळयात आनंदाश्रू होते. यातील एक सातारा येथील तर दुसरा उत्तर प्रदेशातील आहे. हे दोघे पुणे येथे नोकरीला आहेत. हे दोघे किल्ले रायगड फिरायला आले होते. हिरकणी बुरुज परिसरातुन शॉर्टकटने खाली उतरण्याच्या प्रयत्नांत दोघेही रस्ता भरकटले आणि किल्ल्यावर अडकले हाेते. स्थानिकांनी त्यांना संकटातून बाहेर काढल्याने त्यांच्या जिवात जीव आला हाेता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.