जळगावात तरुणावर चॉपरने हल्ला

0

जळगाव : रस्त्याने अडवून अर्जुन रोहिदास राठोड (वय २४, रा. पंचमुखी हनुमान मंदिर परिसर) या तरुणावर चॉपरने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी सोमवार, २० मे रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील उमराव लॉन्स येथे अर्जुन राठोड हा तरण वास्तव्यास आहे. दि. १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता तो हॉटेलमध्ये जेवण करुन तो पंचमुखी हनुमान मंदिराजवळील पायघन हॉस्पीटलसमोर पाण्याची बॉटल घेण्यासाठी थांबला होता. याठिकाणी दोन दुचाकीवरुन पाच इसम त्याठिकाणी आले. त्यांनी काहीही एक कारण नसतांना राठोड याला मारहाण न करण्यास सुरुवात केली. तसेच त्यातील एकाने चॉपर सारख्या हत्याराने अर्जुन राठोड याच्या डोक्यावर वार – करुन त्याला गंभीर जखमी केले. त्यातील एक इसम हा अनिल घुले हा होता. दरम्यान, याप्रकरणी राठोड याने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून अनिल घुले नावाच्या व्यक्तीसह त्याच्या सोबत अनोळखी चार ते पाच जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच डोक्यात चॉपर मारला होता. याप्रकरणी मारहाण न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोकॉ पल्लवी मोरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.