रक्षाबंधन: एकमेकांसाठी एक आश्वासक वचन – गुरुदेव श्री श्री रविशंकर

0

लोकशाही विशेष लेख 

 

श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. हे तुमचे रक्षण करणारे असे एक बंधन आहे, ज्यात प्रेम आणि आपुलकीचा उत्सव आहे. जात, वर्ग, धर्म किंवा लिंग यांच्या पलीकडे जाऊन यात प्रत्येकजण सहभागी होतो. बहिणीच्या प्रेमाने आणि उदात्त भावनेने गुंफलेल्या या धाग्याला ‘राखी’ म्हटले जाते आणि जेव्हा ती प्रत्येकाला आंतरिक भावनेने एकत्र आणते तेव्हा साऱ्या सामाजिक प्रतीकांच्या पलीकडे घेऊन जाते. भारताच्या विविध भागात रक्षाबंधनाला राखी, बालेवा आणि सालुनो असेही संबोधले जाते.

गुणवत्तेच्या आधारावर, बंधनाचे तीन प्रकार आहेत: सात्विक, राजसिक आणि तामसिक.  जेव्हा हे बंधन सात्विक असते, तेव्हा ते ज्ञान, सुख आणि आनंदाशी जोडलेले असते;  राजसिक बंधन म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या इच्छा आणि लालसेने बांधलेले आहात;  आणि तामसिक बंधनात एक प्रकारचा संबंध असतो पण त्यात तृप्ती किंवा समाधान नसते.  उदाहरणार्थ, धूम्रपानाची सवय असलेल्या व्यक्तीला त्यातून आनंद मिळत नाही, तरीही तो सोडण्यासाठी धडपडत असतो. रक्षाबंधन हे एक सात्विक बंधन मानले जाते, जे ज्ञान आणि आपुलकीच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणते.

आज हा सण भावंडांसाठी एक सण म्हणून पाहिला जात असला तरी, पूर्वी केवळ असेच नव्हते. ऐतिहासिकदृष्ट्या, राखीची संकल्पना विविध परिस्थितींमध्ये संरक्षणाचे प्रतीक आहे.  हे आई, पत्नी किंवा मुलीद्वारे बांधले जाऊ शकते.  ऋषी त्यांचे आशीर्वाद मागणाऱ्यांना राखी बांधत असत, तर सुज्ञांनी या पवित्र धाग्याचा दुष्टपणाविरूद्ध ढाल म्हणून वापर केला.. काही परंपरांमध्ये, याला ‘पाप तोडक, पुण्यप्रदायक पर्व’ किंवा वरदान देणारा आणि सर्व पापांचा अंत करणारा दिवस असे मानले जाते. ऑगस्ट महिन्यातील पौर्णिमा देखील द्रष्ट्यांना – ऋषींना समर्पित केलेली आहे.

जेव्हा आपण आतासारख्या वैविध्यपूर्ण समाजात राहतो, तेव्हा त्यात वाद, मतभेद तसेच गैरसमज, तणाव, असुरक्षितता आणि भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे. भीती आणि अविश्वासाने जगणारा समाज रसातळाला जातो.  हा रक्षाबंधनासारखा सण आहे जिथे आपण एकमेकांना आश्वासन देतो, “बघ, मी तुझ्या पाठीशी आहे.”

आपल्याला सहसा असे वाटते की बंधनामुळे दुःख येते. परंतु खरे पाहता, अध्यात्मिक ज्ञानाच्या, गुरुच्या, सत्याच्या तसेच आत्म्याशी असलेल्या तुमच्या बंधनामुळे तुम्ही तरलेले आहात. एक दोरी तुमचे रक्षण करण्यासाठी किंवा तुमचा गळा घोटण्यासाठी ही बांधली जाऊ शकते.  सांसारिक इच्छा असलेले लहान मन तुमचा गळा आवळू शकते, परंतु जेव्हा ते मोठ्या मनाशी, ज्ञानाशी जोडले जाते तेव्हा तुम्ही मुक्त होता.

Leave A Reply

Your email address will not be published.