गुळवेल (भाग तीन)

0

लोकशाही विशेष लेख

 

गुळवेलीचे (Gulvel) आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्व थोडक्यात, यकृतोत्तेजक कार्य – यकृत हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. सुमारे 500 महत्त्वाची कार्ये व 1000 विविध पाचक स्राव निर्माण करणारे शरीरातील हे एकमेव इंद्रिय आहे. गुळवेलीमुळे यकृताचे कार्य चांगले होऊन आपले आरोग्य चांगले रहाते, कारण यकृतामुळे शरीराच्या सर्वच अवयवांचे कार्य सुधारते.

हृदय कार्य – गुळवेलीमुळे हृदयाचे रक्ताभिसरण सुधारतेच, शिवाय मानसिक ताण कमी होत असल्याने सध्याच्या तणाव युगातील (stress-age) सततच्या मानसिक ताणतणावामुळे हृदयावर होणारे दुष्परिणामही टळून हृदय बळकट बनते.

रसायन कार्य – आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यामुळे गुळवेलीचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते. म्हणूनच आपण प्रत्येकाने अगदी तुळशीप्रमाणेच गुळवेलही आपल्या परसात लावून दररोज गुलवेलीची ताजी 4-6 पाने चावून खावीत. ते शक्य नसल्यास गुळवेलसत्त्व खात्रीच्या जुन्या आयुर्वेदिक कंपनीचेच वापरावेत, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. दररोजच्या गुळवेलीच्या सेवनाने आपले तारुण्यरक्षण होऊन म्हातारपण दूर राहीलच, पण व्याधीचाही प्रतिकार होऊन शरीर निरोगी, सतेज राहील यात शंका नाही.

ज्वरघ्न गुळवेल
गुळवेलचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म ती ज्वरनाशक, ज्वरध्न आहे. गुळवेल ही डेंग्यू, चिकन गुनिया, फ्लू, स्वाईन फ्लू इत्यादी विभिन्न व्हायरल इन्फेक्शन वर रामबाण औषधी आहे. मागील वर्षी दिल्लीमध्ये डेंग्यू तापाची साथ पसरली होती. तेथील द्वारका या वसाहतीतील उदाहरण उल्लेखनीय आहे. या वसाहतीतील शेकडो कुटुंबांमध्ये डेंग्यूचा प्रकोप झाला. डेंग्यूने फणफणणारा १०४ फॅ.पर्यंतचा ताप, संपूर्ण अंगात विशेषत: सांध्यात भयंकर वेदना होत्या. रक्ताची चाचणी केली असता डेंग्यू असल्याचा रिपोर्ट आला. त्याच वसाहतीमध्ये बाबा रामदेवांचे पतञ्जली योग केंद्र कार्यरत होते. त्यांच्या प्रमुखांनी सर्वांना गुळवेल घेण्याचे सुचविले. तसेही डेंग्यू किंवा तत्सम व्हायरल तापांसाठी आधुनिक वैद्यक शास्त्रात औषध नाही आणि समाधानाची बाब म्हणजे सर्वांना आराम मिळाला. अशा व्हायरल तापाने ग्रस्त अनेक रुग्णांचा केवळ गुळवेलमुळे आजार दूर झाल्याचा अनुभव आहे. डेंग्यूसारख्या व्हायरल तापामध्ये रुग्णांच्या रक्तातील श्वेेत रक्तपेशी प्लॅटिलेट्‌स चे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. अशा रुग्णांना प्लाझ्मा रक्तघटक दिल्या जातो. परंतु अशा रुग्णांना गुळवेल दिल्यास त्यांच्या श्वेयत रक्तपेशीव प्लॅटिलेट्‌स लवकर सामान्य होतात.

कॅन्सर व गुळवेल
कॅन्सरवर गुळवेलच्या संशोधनाचे परिणाम आशादायी आहेत. कर्करोगाच्या रुग्णास किमोथेरपी चिकित्सा सुरू असताना त्याचे दुष्परिणाम अतिशय कष्टदायक असतात. मळमळ, उलट्या, तोंडास फोडे येणे, भूक न लागणे, शरीराचा दाह होणे, अशक्तपणा इ. दुष्परिणाम भोगावे लागतात. मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या संशोधनाद्वारे हे तथ्य समोर आले आहे की, अशा रुग्णांना गुळवेल दिल्यास वरील दुष्परिणाम कमी होतात व रुग्ण लवकर बरा होतो.

बाजारात मिळणारी गुळवेलीची औषधे
अमृतारिष्ट, गुडुच्यादी चूर्ण, गुडुच्यादी क्वाथ (काढा). गुडुची लोह (पंडुरोगात अत्यंत उपयोगी) गुडुची सत्त्व. गुडुची तेल – त्वचारोग व वेदना कमी करण्यासाठी बाहेरून लावावे.

पाककृती – गुळवेलीची भाजी.
साहित्य – गुळवेलीची कोवळी पाने, चिरलेला कांदा व लसूण, तेल, तिखट. मीठ इ.
कृती – गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन, चिरून घ्यावीत. तेलात कांदा व लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यावी. नंतर त्यामध्ये चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यावे. वाफ देऊन भाजी शिजवून घ्यावी.

संतोष ढगे, सांगली
८२०८४२६४९४

Leave A Reply

Your email address will not be published.