गुलाबराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा करण्यात आली.  जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व विचार जनमानसात पोहचावे व मुख्यत्वे तरुणांमध्ये पोहचावे यासाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कला वाणिज्य व विज्ञान या तिन्ही विभागातून 23 मुलांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर सुंदर आणि उत्तम असे विचार मांडले. परीक्षक म्हणून उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. भुषण पाटील, प्रा. मोनिका पाटील, प्रा. शुभांगी सोनवणे, प्रा. संजय बाविस्कर यांनी परीक्षकाची भूमिका बजावली.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव गुलाबराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  डी. डी. कंखरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला. सूत्रसंचालन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापिका जयश्री सूर्यवंशी यांनी केले.

महाविद्यालयाचे प्रा. भुषण पाटील,  प्रा. संजय बाविस्कर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या  प्राध्यापिका शुभांगी सोनवणे मॅडम यांनी उत्कृष्ट कविता सादर केली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर  यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची महती सांगितली.

आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मोनिका पाटील यांनी केले व सोबत मुख्य परीक्षेचा निकाल घोषित करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सचिन पाटील व  गायत्री सपकाळे यांनी अनमोल सहकार्य केले. प्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.