केळीच्या नुकसान भरपाईत मोठी वाढ

राज्य सरकारचा निर्णय : गुलाबराव पाटलांच्या पाठपुराव्याला यश

0

 

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क 

केळीचे नुकसान झाल्यास आता राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर भरपार्इ देण्यात येणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्या संदर्भात शासन निर्णय झाला असून हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारच्या सुधारीत निर्णयानुसार आता हिवाळ्यातील कमी तापमानाचा निकषात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास, आता हेक्टरी 32 हजार 179 रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. आधीच्या निकषात ही भरपाईची रक्कम 26 हजार 500 इतकी होती. एप्रिल महिन्यातील जास्त तापमानाचा निकषात पात्र झालेला शेतकऱ्यांना आता हेक्टरी 42 हजार 500 रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. मे महिन्यात सलग पाच दिवस 45 अंश तापमान राहिल्यास आता नुकसान भरपाईची रक्कम 52 हजार 821 इतकी करण्यात आली आहे. गारपीट व वादळी पावसामुळे केळी उत्पादकांचे नुकसान झाल्यास, आता हेक्टरी 85 हजार रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.

 

विमा हप्त्याची रक्कमही घटविली

ज्या शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळ पिक विमा काढणार आहेत त्या शेतकऱ्यांची विम्याची रक्कम देखील गेल्या वेळे पेक्षा आता कमी होणार आहे. 2023-24 मध्ये ही रक्कम हेक्टरी 10 हजार 500 होती. ती आता 8 हजार 500 रुपये इतकी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी या-ना त्या कारणाने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत येत असे, त्याला आता आर्थिक हातभार लावला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.