“गुलाबभाऊ तुम आगे बढो..” : चक्क बद्रीनाथला घोषणाबाजी

पालकमंत्र्यांच्या विजयासाठी तरुणांनी केली प्रार्थना

0

 

बद्रीनाथ, लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तराखंडमध्ये चार पवित्र तीर्थक्षेत्र स्थित आहेत. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. याठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणवर भक्त यात्रेसाठी येत असतात. या यात्रेला ‘चार धाम यात्रा’ म्हणून ओळखली जाते. याच चारधाम पैकी एक असलेल्या बद्रीनाथ धाम मंदीरात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. सोबतच बॅनर झळकावून “गुलाबभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है…”, “जय भवानी, जय शिवाजी…” अशी घोषणाबाजी झाली.

 

पाळधी येथील भोई वाडा परीसरातील लोकमान्य मित्र मंडळाच्या सदस्यांनी आज दि. १७ रोजी बद्रीनाथ महादेव मंदिर येथे दर्शन घेतले. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कॅबिनेट ना.गुलाबराव पाटील यांचा फोटो झळकवत गुलाबराव पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

 

बद्रीनाथ मंदीराबाहेर झळकवण्यात आलेल्या या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ना.गुलाबराव पाटील यांचे फोटो असून ना.गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 

गेल्या सहा महिन्यांपासून हिमवर्षामुळे बंद असलेल्या या पवित्र ठिकाणाचे दर्शन भक्तांसाठी खुले झाले आहेत. चार धाम यात्रा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र यात्रा समजली जाते. दरवर्षी लाखो भाविक या पवित्र तीर्थस्थानांना भेट देतात. यापैकी बद्रीनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पाळधी येथील तरुण गेल्या आठवड्यात रवाना झाले होते. आज त्यांनी बद्रीनाथ मंदिराचे दर्शन घेऊन पालकमंत्र्यांच्या विजयासाठी प्रार्थना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.