सोने घसरले तर चांदी वधारली, पहा आजचे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोन्याच्या दरात सलग दुसन्या दिवशी घसरण झाली आहे. आज सोन्याचे भाव 210 रुपयांनी खाली आहेत. त्यामुळे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे भाव 59840 रुपये आहेत, तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 54850 रुपये आहेत. सोन्याच्या दरात कालही 180 रुपयांची घसरण झाली होती. दरम्यान चांदीमध्ये अचानक 1000 रुपयाची वाढ झाल्याने आज चांदीचे भाव 75500 रुपये किलो झाले आहेत.

जळगावातील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आज जळगावातील सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव  54,600 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,450 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 73,000 रुपये आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.