सोने चांदीच्या दरात घसरण, पहा आजचे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज सोने चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,७६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,१३० रुपये प्रतिकिलो होती.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५३,८६३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,७६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,८६३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,७६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,८६३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,७६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,८६३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,७६० रुपये आहे.

जळगावातील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजचे  सोन्याचे दर ५८७५० रुपये तर चांदीचे दर ७१२०० रुपये आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.