मंत्री गिरीश महाजन यांचा जरांगेना फोन, “आरक्षण नक्की मिळणार, उपोषण मागे घ्या” 

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी मंत्री गिशिष महाजन यांनी फोनवरून संपर्क केला. उपोषण करू नका, असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. तुम्ही एक महिना मुदत मागितली. तुमच्या शब्दाला मन देत आम्ही एक महिन्याऐवजी ४१ दिवस दिले, आता अडचण काय आहे, आमचं काय चुकलं, असा सवाल जरांगे याची यांनी महाजन यांना केला आहे.

उपोषण करू नका, महाजन यांची विनवणी 

समितीचा अभ्यास सुरु असून, आरक्षण लवकरच मिळेल, काहीतरी सकारात्मक होईल, साखळी ठेवा मात्र उपोषण नका करू, असं म्हणत गिरीश महाजन यांच्याकडून जारांगेना विनवणी करण्यात आली. समितीचा अभ्यास ४० वर्षांपासून सुरूच आहे. मराठा आंदोलकांवरील खटले दोन दिवसात मागे घेतो, ते अजून मागे घेतलेले नाही, असं प्रत्यत्तर जरांगे यांनी महाजन यांना दिल आहे.

मराठ्यांवरील गुन्हे कधी मागे घेणार?

मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, तुम्ही म्हटले होते, अजून एकही गुन्हा मागे घेतलेला नाही. तुमच्याकडून तेही होत नाही आणि तुम्ही आरक्षण काय देणार, असं जरांगे यांनी महाजन यांना म्हटलं. आता १५-१६ जणांनी आत्महत्या केल्या त्याबद्दलही सरकारला काही सहानुभीती नाही. आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदत करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनाआदेश द्या, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.

आपण मार्ग काढू : गिरीश महाजन

तुम्ही उपोषण मागे घ्या, आपण मार्ग काढू, मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर आहे. एकदम असं आरक्षण देता येणार नाही.आम्हाला असं आरक्षण द्यायचं आहे, त्याला कुणीही चॅलेंज करु शकत नाही. न्यायालयात आव्हान देता येणार नाही. त्यासाठी आम्हला वेळ द्या, समाजाला आंदोलन उग्र करु नका, आत्महत्या करु नका, असं मराठा समाजाला आवाहन करण्याची मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.