जीडीसीए परीक्षेचे अर्ज फक्त ऑनलाइनच स्वीकारणार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव केंद्रावर जी.डी.सी.ॲड ए व सी.एच.एम. परीक्षा 27 व 29 मे 2022 रोजी होणार आहे. त्यासाठी परीक्षार्थीकडून Online पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. Online Application व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

परीक्षेचे Online अर्ज भरण्याची मुदत 10 ते 20 मार्च, 2022 या कालावधीत असून Online अर्ज भरण्याबाबत सविस्तर सूचना सहकार खात्याच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या Website व उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच Online अर्ज https:gdca,Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरता येतील.

जे परीक्षार्थी या परीक्षा देवू इच्छितात, अशा परीक्षार्थीनी परीक्षेसंदर्भात आवश्यक ती माहिती सहकार खात्याच्या संकेतस्थळावरून प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.