श्री संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळा ; ५० हजारांच्यावर भाविकांची गर्दी

0

शेगाव,;- श्री संत श्री गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रगटदिन उत्सव सोहळ्यासाठी शेगाव संत नगरी भाविकांनी गजबजली आहे. रविवार दि.३ मार्च रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत व ‘गजाननाच्या नामघोषात हा सोहळा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे दुपारी संत नगरीतून भव्य पालखी सोहळा निघणार आहे.

संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सवाला २५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. मागील सात दिवसांपासून राज्याच्या विविध भागांतून भजनी दिंड्यांचे आगमन होत आहे. टाळमृदंगाच्या गजरामुळे संतनगरी गजबजून गेली आहे. दिंड्यांच्या मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी विश्रांती, चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

श्रीच्या १४६ व्या प्रगटदिनी रविवार ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता मंदिरात.महारुद्रस्वाहाकार यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान ब्रह्मवृंदांच्या मंत्रोपचारात होणार आहे. तदनंतर’ सकाळी १० ते १२ शेगांवी श्रींच्या प्रागट्या’ निमित्त हभप भरतबुवा पाटील म्हैसवाडी यांचे किर्तन होईल. अश्व, पताकाधारी वारकऱ्यांसह टाळमृदंगाच्या निनादात राजवैभवी थाटात श्रींचा भव्य पालखी सोहळा निघणार आहे. तर दि. ४ मार्च सोमवार रोजी सकाळी ७ ते ८ हभप प्रमोदबुवा राहणे यांचे काल्याचे किर्तन दहीहंडी व गोपालकाल्याने या प्रगटदिन उत्सवाची सांगता होईल.

दर्शनासाठी एकेरीमार्ग
श्रींच्या प्रगट दिन सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी, श्री मुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी पलंग, तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.