Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जी. एच. रायसोनी महाविद्यालयात १६३ विद्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती
    जळगाव

    जी. एच. रायसोनी महाविद्यालयात १६३ विद्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “एमसी टॅलेंट हंट” या आयटी कंपनीमार्फत रायसोनी महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व निवडकर्ते म्हणून “एमसी टॅलेंट हंट” या कंपनीच्या संचालिका मोनिका चौधरी, रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. यावेळी २११ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर १६३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या संकल्पनेतून रोजगार, समपुदेशन व मार्गदर्शन केंद्राची महाविद्यालयात स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयात असलेल्या ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करणे, विध्यार्थ्यानी व्यवसाय करावा, यासाठी केंद्र कार्य करते. सुरवातीला कंपनीच्या संचालिका मोनिका चौधरी यांनी मुलाखती व निवड प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजवून सांगत विविध टप्यात उपस्थित विध्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती घेतल्या. प्लेसमेंट आसोसीएट डीन प्रा. मनीष महाले यांनी प्रास्ताविक केले. तर लिजी वर्गीज या विध्यार्थिनीने सूत्रसंचालन केले तसेच प्रा. करिष्मा चौधरी व प्रा. तुषार वाघ यांनी सहकार्य केले. हि सर्व प्रक्रिया ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर परिसर मुलाखतीत सहभागी विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले़.

    G.S. H.S. Raisoni College
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif