न्यू बी. जे. मार्केट परिसरात व्यावसायिकाला मारहाण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

शहरातील नवीन बी.जे.मार्केट परिसरात अनेक व्यवसायिक कार्यरत आहेत. रोज अनेकांशी संपर्क येत असतो. अश्यात नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ग्राहकांना दुकानात बोलण्यात येते. अश्याचं ग्राहक बोलविण्याच्या कारणावरून एका व्यावसायिकाला शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

खुलाश तिलकराज शर्मा (वय-३१, रा. सिंधी कॉलनी,जळगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. शर्मा हे न्यू बी.जे. मार्केट परिसरात दुचाकी स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. शर्मा यांचे न्यू बी.जे. मार्केट परिसरात दुचाकी दुरुस्तीचेही गॅरेज आहे. त्यांच्या दुकानाजवळच नजीमशेख अजीज (वय-३७, रा. सुप्रिम कॉलनी) हा दुचाकीचे काम करतो.

 

दरम्यान शनिवारी २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता माझे ग्राहक तुझ्याकडे का बोलवतो, असे म्हणत रागात खुशाल शर्मा यांना नजीमशेख अजीज याने शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सलीम तडवी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.