शेतरस्त्याच्या वादातून २ गटात तुफान हाणामारी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पिंपळगाव बुद्रुक येथे शेती वहिवाटीच्या रस्त्यावरून दोन शेतकरी कुटुंबांमध्ये शुक्रवारी (ता. १०) वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने एकजण गंभीर असून, याप्रकरणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव बुद्रुक (ता. भुसावळ) येथील शेतकरी विष्णू तळेले व निवृत्ती पाटील यांचे करंजी शिवारात गट क्रमांक १७४/१ शेत आहे. या शेत गटामधील शेती वहिवाटीच्या रस्त्यावरून दोघांमध्ये पूर्वीपासून वाद आहे. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास शेताजवळ पुन्हा वाद झाला व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये किरण पाटील, निवृत्ती पाटील, व सविता पाटील यांना विष्णू तळेले, रामा तळेले व रेखाबाई तळेले यांनी शिवीगाळ करीत काठी व दगडाने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

यात किरण पाटील व विष्णू पाटील हे दोघं जखमी झाले असून, त्यांच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. यापैकी एकजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित दोघे किरकोळ जखमी झाले. सविता पाटील यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांतयात किरण पाटील व विष्णू पाटील जखमी झाले असून, त्यांच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. यापैकी एकजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावला हलविण्यात आले. उर्वरित दोघे किरकोळ जखमी झाले. सविता पाटील यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ, पोलिस उपनिरिक्षक परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी प्रमोद कंखरे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.