वेले येथे दिंडी प्रस्थानचे किर्तन होऊन वारी पंढरपूरकडे मार्गस्थं

0

चोपडा |  तालुक्यातील वेले येथे १ जूनला रात्री दिंडी प्रस्थानचे किर्तन होऊन २ जुनला सकाळी ग्रामप्रदक्षिणा, प्रवचन स्वागतसमारंभ व महाप्रसादाचा लाभ घेऊन वारी पंढरपुरकडे मार्गस्थं झाली.दिंडीचे आयोजन ह.भ.प.किशोर महाराज सोनखेडीकर,गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर व वेले येथील वारकरी ग्रामस्थं मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी,प्रमुखपाहुणे म्हणुन माजी आमदार कैलास पाटील, घनश्याम पाटील, सौ.इंदिराताई पाटील, घनश्याम अग्रवाल, शांताराम पाटील, रमेश पाटिल, राकेश पाटील, देवेंद्र पाटील, प्रकाश रजाळे, स्तेफन सपकाळे, रमाकांत बोरसे, शरद पाटिल, राजेंद्र पाटील, भाईदास पाटिल, निर्मला पाटील, सरपंच सौ वैजयंताबाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांचे वेले ग्रामस्थांतर्फे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक जगन्नाथ बाविस्कर यांनी केले.यावेळी अरूणभाई गुजराथी,शांताराम पाटिल, घन:शाम पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले.मान्यवरांनी ह्या दिंडीकार्यासाठी रोख रक्कम स्वरूपात देणग्यांसह औषधीगोळ्यांचे पॉकेटही दिलेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रघुनाथ पाटिल, राजेंद्र पाटिल, जगन पाटील, विश्वास पाटील, वाल्मिक पाटील, मधुकर पाटील, धर्मा पाटील, ह.भ.प.तुळशीराम महाराज, गंगाधर पाटील, शांताराम पाटील, विनोद पाटील, भागवत पाटील, प्रवीण पाटील, सोपान पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भिकन कंखरे, संतोष पाटील, शांताराम पाटील, विश्वास पाटील, धुडकू पाटील, प्रभाकर पाटील, योगेश पाटील, प्रल्हाद पाटील, राजेंद्र पाटील, संजय कंखरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, रावसाहेब पाटील, किशोर पाटील, रवींद्र पाटील, रमेश पाटील, पंडित पाटील, सुनील पाटील, नारायण पाटील, संदीप पाटील, मोतीलाल पाटील, भाईदास पाटील, देविदास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भास्कर पाटील, गणेश पाटील, संतोष पाटील, संभाजी पाटील, सुधाकर पाटील, दीपक पाटील, संजय पाटील, गुलाब महाराज, वैभवराज बाविस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचलन लेखक कवी रमेश जे.पाटील (आडगाव) व माजी सरपंच विनोद पाटील (वेले) यांनी तर आभार प्रदर्शन मार्केटचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.