धुळ्यात बॅनर वरून २ गटात तुफान हाणामारी, दंगलीत १५ पोलिस जखमी

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

बॅनर फाडल्याच्या वादातून धुळ्यातील चरणपाडा गावात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन गटात जोरदार वाद होऊन दगदफेक झाली. इतकंच नाही तर, पोलिसांवरही हल्ला झाला. त्यांच्या वाहनांचे देखील नुकसान करण्यात आले होते. या घटनेत १५ पोलिस आणि ३ नागरिक जखमी झाले. याप्रकरणी एकूण १५० ते २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला असून, सध्या सांगवीत तणावपूर्ण शांतता आहे. या दंगलीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. जमावाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत असलेल्या शिरपूरचे आमदार काशिनाथ पावरा यांच्या गाडीवर देखील हल्ला केला होता.

नेमकं प्रकरण काय?
शिरपूर तालुक्यातील सांगवीजवळ असलेल्या चरणपाडा गावात आदिवासी दिनाच्या शुभेच्छांचं बॅनर लावण्यात आले होते. ये बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडला की ते फाटलं यावरून दंगल पेटली. बॅनर फाडल्यावर दोन गटात वाद झाला. हळूहळू हा वाद विकोपाला गेला आणि दोन गटात राडा सुरु झाला. मग मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरु झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र संतप्त जमाव ऐकण्यास तयार नव्हता. जमाव अधिक आक्रमक झाला आणि लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला. यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले.

या दंगलीत पोलिसांच्या आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. सोबतच 15 पोलीसही जखमी झाले. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. तरीही जमाव नियंत्रणात येत नव्हता. यानंतर पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या. अतिरक्त कुमक मागवून पोलिसांनी अथक प्रयत्नांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात तणापूर्ण शांतता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.