धरणगाव रेल्वेस्थानकावर ३८ वर्षीय इसमाचा मृत्यू; ओळख पटवण्याचे आव्हान

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

धरणगाव रेल्वेस्थानकावर 25 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास एका 38 वर्षीय इसमाची नैसर्गिक रित्या मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. सदर व्यक्तीची ओळखी न पटल्याने ओळख पटवण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांनी केले आहे.

मृत व्यक्तीच्या उजव्या हातावर जय दादाजी असे नाव गोंधले असून रंग गोरा, उंची 5 फूट, सडपातळ बांधा, अंगावर निळ्या रंगाचे फुल शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट असे वर्णन आहे. सदर घटनेची नोंद नंदुरबार रेल्वे पोलिसात करण्यात आहे. पुढील तपास पो.हे.कॉ जयकुमार कोळी करत आहे. सदर व्यक्तीची पटल्यास 7083754111 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.