धानोरा येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्वराज्य सप्ताह निमित्त कांताई नेत्रालय व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र चौधरी यांच्याकडून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 300 रुग्णांची तपासणी करण्यात आली. आवश्यकता असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

धानोरा येथे आयोजित नेत्र तपासणी व उपचार शिबिरास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, चोसाका संचालक नारायण पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिकचंद महाजन, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नारायण पाटील, सरपंच रज्जाक तडवी, सूर्यकांत खैरनार, युवक अध्यक्ष शुभम सोनवणे, भाजपाचे जितेंद्र महाजन, अतुल पाटील, रविंद्र शिरसाठ, भुषण खेवलकर, अशोक चौधरी, संदीप चौधरी, प्रवीण पाटील, युवराज पाटील, प्रशांत महाजन, प्रवीण छगन पाटील, कैलास टेलर पाटील, गणेश महाजन, पत्रकार रावसाहेब पाटील, वासुदेव महाजन, एस.पी.महाजन, निवृत्ती खैरनार, रवी महाजन, युवराज चौधरी, भुषण चौधरी, भरत पाटील, नितीन महाजन, पन्नालाल महाजन, राजू चौधरी, डॉ.जाकीर शेख, गजानन खेवलकर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तालुका उपाध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.