इराणवर २४ तासात विजय मिळवू ; तालिबानची धमकी

0

तेहरान ;- अफगाणिस्तान-इराणच्या सैन्यात रविवारी पाण्यावरून हिंसक चकमक झाली. दोन्ही देशांत इस्लामिक रिपब्लिक सीमेवर जोरदार गोळीबार झाला. इराणच्या सिस्तान व बलुचिस्तान आणि अफगाणच्या निमरोझ प्रांताच्या सीमेवर ही लढाई झाली.

त्यात एका तालिबान्यासह इराणचे 3 सैनिक मारले गेले. दोन्ही देशांत हेलमंड नदीच्या पाण्यावरून वाद सुरू आहे. इराणी मीडिया इर्नाने या गोळीबारासाठी तालिबानला जबाबदार धरले. दरम्यान, तालिबानने हे युद्ध इराणने सुरू केल्याचा दावा केला असून तालिबान नेत्यांनी परवानगी दिली, तर आम्ही अवघ्या 24 तासांत इराणवर विजय मिळवू, अशी धमकी तालिबानचा कमांडर हमीद खोरासानीने दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.