राजधानी दिल्लीत वातावरण ‘दूषित’ करण्याचा प्रयत्न, वाचा सविस्तर

0

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतात पुढील महिन्यात ९ ते १० सप्टेंबर जी-२० संमेलनाचा आयोजन होणार आहे. त्याआधी राजधानी दिल्लीमध्ये वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था असताना दिल्लीच्या अनेक मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर काळ्या रंगात भारत विरोधी आणि खलिस्तानच्या समर्थनात घोषणा लिहिण्यात आल्या आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलिसांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली. दिल्लीच्या पाच मेट्रो स्टेशनवर काहींनी ‘दिल्ली खलिस्तान होईल’ आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’ असा आशयाच्या लिहिल्या होत्या. दिल्ली पोलिसांनी याविरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. दाव्यामुळे, या प्रकारामागे बंदी घालण्यात आलेली संघटना शीख फॉर जस्टीस हिचा हात आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, जी-२० संमेलनाच्या आधी शीख फॉर जस्टिसने दिल्ली मेट्रो स्टेशनवरील रॉ फुटेज जारी केली आहे. मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर खलिस्तानच्या समर्थानात घोषणा देण्यात आले आहेत. फुटेजमध्ये दिल्लीतील मेट्रो स्टेशन शिवाजी पार्क ते पंजाबी बाग एसएफजी कार्यकर्ते खलिस्तान समर्थनार्थ घोषणा देताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.