जिवलग दोस्तांचा शेवट बघून गाव हळहळले !

0

 

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क 

दोन जीवलग मित्रांचा एकत्र मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हे दोघे लहाणपणापासून एकत्र होते आणि त्यांनी एकत्रच जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चाळीसगाव तालुक्यातील भोसर शिवारातील महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास छगन बागूल (वय ४४) आणि अंकुश काशिनाथ गायकवाड (वय ३५ रा. चिंचगव्हाण ता. चाळीसगाव) असे मयत मित्रांची नावे आहेत.

 

अन्‌ जिगरी दोस्तांचा मृत्यू

विलास बागुल आणि अंकुश गायकवाड हे चिंचगव्हाण गावात वास्तव्याला होते. दोन्ही जिगरी मित्र म्हणून गावात ओळख होती. दोघेजण दुचाकी क्रमांक (एमएच १५ डीटी ५७८८) ने सांगवी ता. चाळीसगाव येथे कामाच्या निमित्ताने जात होते. दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातील भोसर शिवारातील महामार्गारून दोघेजण जात असतांना मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एचआर ६२ ए १०८३) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती, की दुचाकीवरील विलास बागूल व अंकुश गायकवाड हे दूरवर फेकले जाऊन यांना जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

 

लहानपणापासून राम -शाम’ची जोडी

विलास बागुल व अंकुश गायकवाड हे दोघे मित्र लहानपणापासून सोबत होते. कुठे जायचे म्हटल्यावर दोघे मित्र सोबत जात असत. एकमेकांचे दुःख सुख जाणून घेत त्यामुळे या दोघांची जोडी ‘राम -शाम’ अशीच होती या दोघांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.