दलाई लामांचा वाद्ग्रस्त व्हिडीओ, दिलगिरी व्यक्त करत दिले स्पष्टीकरण

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा वादग्रस्त व्हिडिओ असल्याची चर्चाही सुरु आहेत. या वादावर आता खुद्द दलाई लामा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच जर यातील कृतीमुळं कोणी दुखावले गेले असतील तर याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं दलाई लामा यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

वादग्रस्त व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना दलाई लामा यांच्या कार्यालयानं म्हटलं की, ‘सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दलाई लामा आणि एका लहान मुलाच्या भेटीचा आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलाने लामा यांना मिठी मारता येईल का? असे विचारले. मात्र, त्यानंतर दलाई लामा यांच्या कृतीमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर , त्याचे कुटुंबीय आणि जगभरातील आपल्या अनेक मित्रांची दलाई लामा माफी मागू इच्छितात’. ‘दलाई लामा हे सार्वजनिक ठिकाणी आणि कॅमेऱ्यासमोर देखील सर्वांशी अगदी निष्पापपणे आणि खेळकरपणे खोडी काढत असतात. पण या घटनेमुळं वाद निर्माण झाल्यानं दलाई लामा खेद व्यक्त करत आहेत,असेही दलाई लामा यांच्या कार्यलयाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.