६० वर्ष एकमेकांसोबत सुखाचा संसार; सोबतच घेतला जगाचा निरोप…

0

 

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील गुजराती पूरा भागातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना आज घडली आहे. तब्बल ६० वर्ष एकमेकांसोबत सुखाचा संसार केल्यावर पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या 8 तासानंतर पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. रमेशसिंग करणसिंग गौतम (वय 82) आणि पदमाबाई रमेश गौतम (वय 72) असे मयात दाम्पत्याचे नाव असून यांचा 60 वर्षापूर्वी विवाह झाला होता.
पदमाबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील असून, रमेशसिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोघांनाही लग्नानंतर दोन मुल आणि दोन मुली आहेत. मुला मुलींचे लग्न होऊन नातवंड झाली. दोघांनी 60 वर्ष सोबत प्रवास केल्यानंतर काल मध्यरात्री त्यांनी अखेरचा जगाचा निरोप घेतला. पती रमेशसिंग यांचा दीर्घ आजाराने काल रात्री 7 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी पदमाबाई यांचा देखील आज पहाटे मृत्यू झाला.
आज दुपारी राहत्या घरापासून वाजत गाजत पती-पत्नीची अंत्ययात्रा काढण्यात आली, दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि बाळापूरच्या स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पती-पत्नीच्या निधनामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, दोघांनीही आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवला. कुटुंबियांनी सांगितलं की, दोघांमध्ये खूप प्रेम होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.