जादा दराने कापूस बियाणे विक्री करणा-या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल

0

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील बियाणे विक्रेता मे. गायत्री ऍग्रो एजन्सी पारोळा यांनी में.तुलसी सिडस् या कापुस उत्पादकाचे कापूस तुलसी १४४(कबड्डी) बियाणे जादा दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती दि.२६.०५.२०२४ रोजी कृषी विभागाच्या भरारी पथकास मिळाली.  मोहन वाघ विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक, कुरबान तडवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव व सुरज जगताप कृषी विकास अधिकारी जि.प. जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आधारे जिल्हा भरारी पथकाने डमी ग्राहक यांना मे.गायत्री एग्रो एजन्सीज वर कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी पाठवले असता बियाणे विक्रेते यांनी रक्कम रुपये ८६४/- चे तुलसी सीड्स यांनी उत्पादित केलेले तुलसी- 144 (कबड्डी) हा वाण रक्कम रुपये १२००/- किमतीस शेतकऱ्यास विक्री करताना रंगे हात पकडले.

सदर घटनेच्या आधारे आज दिनांक २७ मे २०२४ रोजी पोलीस स्टेशन पारोळा येथे गु. र न.१६९/२०२४ अन्वये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईसाठी उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर सी. डी. साठे, विभागीय नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील, मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी पंचायत समिती पारोळा दिनेश कोते व कृषी सहायक  रोहित शिंदे यांनी परिश्रम घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळू गीते करीत आहेत.

शेतकऱ्यांनी जादा दराने कापूस बियाणे करू नये कोणत्याही विक्रेत्याने शासकीय दरापेक्षा जास्त दराची मागणी केल्यास कृषी विभागात तक्रार नोंदवावी.

– मोहन वाघ विभागीय कृषी सहसंचालक

Leave A Reply

Your email address will not be published.